ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांचा सर्वपक्षीय मागणीचा मास्टर स्ट्रोक..!

आमदार वैभव नाईक यांचा सर्वपक्षीय मागणीचा मास्टर स्ट्रोक..!

प्रकाशन: 09 Dec 2023 05:01 AM
वाचन संख्या 166

मालवण | प्रतिनिधी : आंबा पिकावर हवामानाबरोबरच इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते त्यावर उपाययोजना करण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीचा विचार करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणाकरीता कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्स मध्ये कृषी विद्यापीठे व कृषी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला असून या टास्क फोर्सने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या प्रभावी नियंत्रणाकरीता संशोधन करुन उपाययोजना कराव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स