ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
घरा घरांवर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने ; अयोध्येतील श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अक्षता व प्रभू श्री रामांची प्रतिमा पोहोचणार महाराष्ट्र राज्यात ९० लाख परिवारांच्या घरी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

घरा घरांवर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने ; अयोध्येतील श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अक्षता व प्रभू श्री रामांची प्रतिमा पोहोचणार महाराष्ट्र राज्यात ९० लाख परिवारांच्या घरी..!

प्रकाशन: 14 Nov 2023 09:11 AM
वाचन संख्या 135

मालवण | सुयोग पंडित : शरयू तीरावरील अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होत आहे. त्या आधी महाराष्ट्रातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून या सोहळ्याच्या अक्षता आणि प्रभू रामांचा एक लॅमिनेटेड फोटो घरोघरी दिला जाणार आहे. प्रत्येक गावात उत्सव साजरा होईल. विश्व हिंदू परिषदेने श्री राम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर उद्घाटनाचे सोहळे गावोगावी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात होतील यासाठी नियोजन केले आहे.

विहिंपचे महाराष्ट्र व गोवा मंत्री गोविंद शेंडे यांनी काल सोमवारी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील ९० लाख कुटुंबांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिले होते. त्या प्रत्येकाच्या घरी विहिंपचे कार्यकर्ते पोहोचतील आणि मंदिराबाबत माहिती देणारे एक पत्रक, अक्षता व प्रभू रामचंद्रांचा फोटो देतील. १ ते १५ जानेवारीपर्यंत राज्यभरातील ७० हजार कार्यकर्ते घरोघरी संपर्क करणार आहेत.

२२ जानेवारीला सकाळी ११ पूर्वी प्रत्येक गाव राममय झालेले असेल. ११ वाजता अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होईल. त्या आधी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू होतील. रस्तोरस्ती सडे शिंपणे, रांगोळ्या काढणे, पताका, ध्वज लावणे हे सगळे लोकसहभागातून केले जाईल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स