रोजगार हमी योजनेतून बांधल्या जाणार १० लाख विहिरी व ७ लाख शेततळी ; शेतकरी वर्गाने ग्रामपंचायती कडे करावी नोंदणी.
मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाच्या अनुषंगाने ‘मनरेगा’चा अंतिम आराखडा तयार करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. रोजगार हमीतून दहा लाख विहिरी व सात लाख शेततळी बांधली जाणार आहेत.
राज्यभरातील दहा लाख हेक्टरवर फळबाग, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम उद्योग आणि बांबू लावगड करण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश ‘रोहयो’ने दिले आहेत. यासाठी शेतकरी वर्गाने ग्रामपंचायत कडे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)