सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्र आणि उद्योग संचनालय मुंबई आयोजित एक दिवसिय कार्यशाळा.
ब्युरो न्यूज /प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उद्योजकाना कळविणेत येते की , उद्योग संचालनालय,मुंबई आणि जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग आयोजित एक दिवसीय एम.एस.एम.ई. क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरूकता वाढविणे साठी कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि.६.११.२०२३ रोजी जिल्हा नियोजन सभागृह,(नवीन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी ओरस या ठिकाणी आयोजित करणेत आलेला आहे. सदरच्या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती, उद्योगाबाबत नवीन धोरणे ई. बाबत संपूर्ण दिवसभर कार्यक्रम आहे. सदरचा कार्यक्रम विनामूल्य आहे.ज्यांना कार्यक्रमा मध्ये भाग घेण्याचा असेल त्यांनी फोन नं. ९४०३०७८७६७ यांचेशी संपर्क साधावा.तरी सकाळी ९.३० वाजता हजर राहावे ही विनंती.ठिकाण – जिल्हा नियोजन सभागृह (नवीन), ओरोस.सोमवार दि. 06 नोव्हेंबरसकाळी – 9:30 वाजता
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)