ओणी येथे आज आमने सामने डबलबारी ; मुणगे गांवचे बुवा समीर महाजन यांचा सामना होणार मुंबईच्या निखील राणेंशी..! .
मसुरे | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील ओणी येथील श्री नवलादेवी मंदिर येथे आज २२ ऑक्टोबर रोजी रात्र नऊ वाजता आमने – सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुवा श्री समीर महाजन (मुणगे, ता देवगड) विरुद्ध बुवा निखिल राणे (जोगेश्वरी मुंबई) यांच्यात हा सामना होणार आहे.
बुवा समीर महाजन यांना पख़वाज साथ तुषार परब, तबला सुनील बोरकर आणि बुवा निखिल राणे यांना पखवाज साई सावंत आणि तबला सागर राणे साथ करणार आहेत. भजन रसिकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन नवलादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)