ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
परवानगी शिवाय केलेले   काॅल रेकाॅर्डिंग कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणात ग्राह्य नाही ; उच्च न्यायालयाची कौटुंबिक न्यायालयाला च़पराक…!

परवानगी शिवाय केलेले काॅल रेकाॅर्डिंग कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणात ग्राह्य नाही ; उच्च न्यायालयाची कौटुंबिक न्यायालयाला च़पराक…!

प्रकाशन: 19 Oct 2023 03:08 AM
वाचन संख्या 32

ब्यूरो न्यूज | नवी दिल्ली : कौटुंबिक न्यायालयाकडे येणार्या प्रकरणांमध्ये फोन काॅल रेकाॅर्डिंग ग्राह्य मानले जाणार नसल्याचा निर्वाळा छत्तिसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राकेश पांडेय यांनी दिला आहे. एखाद्याचे फोन कॉल त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे ‘कलम २१’ अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी पतीला पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर
करण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते ते उच्च न्यायलयाने फेटाळून लावत च़पराक दिली आहे.

पत्नीने पतीकडून पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कॉल रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेश दिले होते. परवानगीशिवाय मोबाइल कॉल रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद तिने केला. महिलेच्या वतीने वकिलाने गोपनीयतेच्या अधिकारावर दिलेल्या निर्णयांचा हवाला देत म्हटले की, घटनेच्या कलम २१ नुसार कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे चुकीचे आहे सबब त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचा आदेश फेटाळण्यात येत आहे.

न्यायाधीश राकेश मोहन पांडेय यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणत्याही व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय मोबाईलवर रेकॉर्ड होणे चुकीचे असल्याचे मान्य केले. गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले. फोनवरील संभाषण हा माणसाच्या खासगी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गोपनीयतेच्या अधिकारात निश्चितपणे घराच्या किंवा कार्यालयातील फोनवरील संभाषण येते. फोन टॅपिंग घटनेच्या ‘कलम २१’ चे
उल्लंघन ठरते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स