देऊळवाड्यातील यशस्विनी मानसी डिचवलकरचा ऑस्ट्रेलियातील निवडीबद्दल आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार ; तेलीवाडीतील महापुरुष मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने आयोजीत सोहळा.
मालवण | सुयोग पंडित : खडतर परिस्थितीवर मात करुन शैक्षणिक प्रगती केलेल्या आणि ऑस्ट्रेलिया येथील कृषी उद्योजकता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या मालवणच्या देऊळवाडा येथील मानसी उमेश डिचवलकर हिचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. मालवण देऊळवाडा तेलीवाडी येथील महापुरुष मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या आई वडिलांचाही सत्कार करण्यात आला. तसेच चंदना दिनेश डिचवलकर हिने दहावी परीक्षेत ९५ % गुण मिळविल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, मनोज मोंडकर, सुहास वालावलकर, उमेश चव्हाण,केदार वालावलकर, नितीन बांदेकर, सदानंद डिचवलकर, अमित डिचवलकर, नितीन बांदेकर, योगेश वालावलकर, कुणाल वालावलकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)