मडुरेतील व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थी वर्गाने जाणून घेतला 'संदेश व टपालाचा प्रवास...!'
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मडूरा येथे जागतिक पोस्ट ऑफिस दिवसाचे औचित्य साधून प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी मडूरा पोस्ट ऑफिसला भेट दिली. पोस्ट मास्टर प्रथमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसची अनेक कामे व कार्यपद्धती समजावली. त्यांना इतर नोंदणी कशी करावी व पत्र कसे पाठवावे स्पीड पोस्ट व तिकीट कोणती कुठे लावली जातात कुठच्या क्रमांकाची लावली जातात, तिथे लावलेली टपाल पेटी ही पण विद्यार्थ्यांनी बघितली व त्याचा अभ्यास केला या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन केले. या संदेश व टपालाच्या प्रवासाची माहिती जाणून घेताना विद्यार्थी वर्गाचा आनंद अवर्णनीय होता.
यावेळी प्रशालेच्या शिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज व तेजस्वी गावडे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)