ताज्या बातम्या
खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी. मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा. एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन.
कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट एनजीओ ऑफ द इयर २०२३' पुरस्काराने सन्मानित ; यूपीएस कंपनीच्या संचालक कॅरोलीना यांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार झाला प्रदान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट एनजीओ ऑफ द इयर २०२३' पुरस्काराने सन्मानित ; यूपीएस कंपनीच्या संचालक कॅरोलीना यांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार झाला प्रदान.

प्रकाशन: 11 Oct 2023 06:09 AM
वाचन संख्या 197

संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी स्विकारला सन्मान.

बांदा | राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्था सामाजिक बदल घडवण्यासाठी गेली ११ वर्षे कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि बालविकास केंद्र अशा अनेक विषयावर काम करते. रस्त्यावरील मुलांसाठी गली स्कूल, आदिवासी मुलांसाठी युवा किरण, महिलांसाठी पॅड यात्रा आणि लाईवलीहूड जनरेशन शिलाई स्कुल, गांवातील स्वच्छ पाण्यासाठी वॉटर एटीम आणि गरजू महिला आणि मुलांसाठी अनेक उपक्रम करत आहे. संस्था गेली ११ वर्षे सातत्याने कार्यरत असून देशातील ४ राज्यांमध्ये संस्थेच्या कामातून हजारो लाभार्थ्यांना मदत झाली आहे. गेली अनेक वर्षे केलेल्या प्रभावशाली कामातून संस्थेचे समाजासाठीचे समर्पण लक्षात घेऊन संस्थेच्या कार्याबद्दल संस्थेला दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सी एस आर अवॉर्ड्स’ मध्ये ‘बेस्ट एनजीओ ऑफ द ईअर’ या राष्ट्रीय पुरस्काराने ‘द हयात सेन्ट्रिक’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतातील शेकडो संस्थानी हजेरी लावली. त्यातील निवडक संस्थाना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल येथे गौरवण्यात आले. यूपीएस कंपनीच्या डायरेक्टर केरोलीना आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांना प्रदान करण्यात आले.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला मिळालेला पुरस्कार हा संस्थेचे सर्व सहकारी, दाते, सामाजिक दायित्व असणाऱ्या कंपन्या आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक झाले हे सर्व कोकण टीमला नवीन ऊर्जा देणारे ठरेल अशी भावना अध्यक्ष दयानंद कुबल यांनी बोलून दाखवली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स