मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा.
ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा.
भाविकांच्या सहभागाचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदेवता श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी सोहळा म्हणजे समस्त मालवणवासिय जनतेच्या जीवन पुनर्जीवन चैतन्याची पारंपारिक वार्षिक पर्वणी...! हा पालखी सोहळा म्हणजे माणसाच्या उन्नतीसह व्यापार, व्यवहार आणि सदाचाराच्या अध्यात्मिक उन्नतीसाठीच्या सक्रियतेचा एक महत्वपूर्ण टप्पा देखिल असतो. दीपावलीच्या मंगलमय पार्श्वभूमीवरच्या ह्या वार्षिकोत्सवाच्या तारखेची घोषणा ही देखिल ह्याच मंगलमयतेच्या पर्वाचा एक बहुप्रतिक्षित तत्व असते.
मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्यानिमित्त मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. भाविकांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे,असे आवाहन श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी, देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देव नारायण व सर्व देवतांना श्रीफळ ठेवून सांगणे करून निघणार आहे. आडवणमार्गे तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर येथे थांबून समुद्रमार्गे श्री देव मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर श्री देव दांडेश्वर मंदिर येथून श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबून जोशी मांड येथे येईल. त्यानंतर नगर वाचनालयाकडून सोमवार पेठेतील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबून बाजारपेठ भरडमार्गे देऊळवाडा येथे मंदिरात येईल.
दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायणाची पालखी प्रदक्षिणा तसेच देव रामेश्वर, देव नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. ग्रामदेवतांची पालखी सजविण्यात येते. भूतनाथ येथे पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे - गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात येते. दुपारी एक वाजता रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटुंबीय आणि गावकर मानकरी रामेश्वरा समोर श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालतात. ढोल-ताशांच्या गजरात पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडते. प्रारंभी श्री. देव रामेश्वर मंदिराभोवती प्रदक्षिणा संपन्न केली जाते. पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर, बंदर जेटीपर्यंत समुद्रकिनारी भाविकांचा प्रचंड उत्साह असतो. समुद्र किनाऱ्यावर बांबूची मंदिरे, देखावे साकारण्यात येतात. मच्छीमारांकडून श्री देव रामेश्वराचे उत्साहात स्वागत करण्यात येत असते. मोरयाचा धोंडा ते बाजारपेठ दरम्यान भाविकांची गर्दी असते. किनारपट्टी ठिकठिकाणी पताका लावून सजविण्यात येते.
यावर्षी पालखी सोहळ्याला मालवणात भाविकांची उच्चांकी गर्दी अपेक्षित आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळा उत्साहात होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. तर भाविक, ग्रामस्थ, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी संघ आणि समस्त मालवणवासिय ह्या सोहळ्याच्या सात्विक साफल्यासाठी प्रयत्नशील आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...
मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन.
मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे...
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंत...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या