ताज्या बातम्या
खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी. मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा. एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन.
खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी.

खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी.

Article image

सिंधुदुर्ग नगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हुंबरट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळ ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची खासदार नारायण राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. लोकसहभागातून अशा प्रकारचे अधिकाधिक बंधारे उभारल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून राबविण्यात आलेली जलसंधारणाची मोहीम कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून १० हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाणी अडविणे आणि जलसंधारणाच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.

Article image


जलसंधारणाच्या या कामात प्रशासनासोबतच स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याच्या अशा प्रयत्नांमुळे भूजलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार असून, भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील, असेही खासदार राणे यांनी नमूद केले.


यावेळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, उपसरपंच नितीन बागवे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संतोष चव्हाण, सदस्य संदीप होळकर, नितीका बागवे, पोलीस पाटील बाबू गुरव, कोतवाल प्रदीप जाधव, गणेश गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स