ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात 'होऊ दे चर्चा' अभियान घेण्याचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सतीश सावंत यांचा इशारा ; ठेकेदारांनी भरलेली टेंडर्स मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचाही केला आरोप.

सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात 'होऊ दे चर्चा' अभियान घेण्याचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सतीश सावंत यांचा इशारा ; ठेकेदारांनी भरलेली टेंडर्स मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचाही केला आरोप.

प्रकाशन: 10 Oct 2023 12:43 AM
वाचन संख्या 168

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विकास कामांच्या निविदा प्रक्रिया राबविताना नवीन अटी शर्ती घालून काही ठराविक ठेकेदारांना कामाचे ठेके मिळवून देत आहेत. कणकवली आणि देवगड मधील वेगवेगळी छोटी छोटी विकास कामे एकत्र करून दोन मोठ्या ठेकेदारांना ती देण्यात आली. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय केला जात आहे. निविदा प्रक्रिया मॅनेज केल्या जात असल्याने निविदेसाठी स्पर्धा होत नाही त्यामुळे शासनाचेही नुकसान होत आहे. ठेकेदारांनी भरलेली टेंडर्स मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्याच कारणामुळे एका ठेकेदाराने आत्महत्या करण्याचा इशारा कार्यकारी अभियंत्यांना दिला होता. कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी करत हे प्रकार बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात ‘होऊ दे चर्चा’ अभियान घेण्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.

कार्यकारी अभियंत्यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचताना सतीश सावंत पुढे म्हणाले, कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथे नदीच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी अंदाज पत्रकात ४१ लाख ९९ हजार ३३१ रु रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या कामासाठी ५ ठेकेदारांनी टेंडर भरले होते. त्यातील ४ ठेकेदारांना धमकावून त्यांची टेंडर मागे घेण्यास लावण्यात आली. तर त्यातील एका ठेकेदाराला ४१ लाख ९९ हजार ३३१ रु रक्कमेच्या इस्टिमेंट रेटनेच २४/०७/२०२३ रोजी वर्कऑर्डर देण्यात आली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक इमारतीमधील अस्तित्वातील स्लॅबच्या छतावर प्रिकोटेड पत्रे घालणे या कामासाठी अंदाज पत्रकात ४१ लाख ४७ हजार १८२ रु रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या कामासाठी ८ ठेकेदारांनी टेंडर भरले होते. त्यातील ७ ठेकेदारांना धमकावून त्यांची टेंडर मागे घेण्यास लावण्यात आली. तर त्यातील एका ठेकेदाराला ४१ लाख ४४ हजार ६९४ रु रक्कमेच्या जवळपास इस्टिमेंट रेटनेच २०/०६/२०२३ रोजी वर्कऑर्डर देण्यात आली.

विकासकामामध्ये सुरुवातीला कमी रक्कम दाखवून मर्जीतील ठेकेदाराला कामाचा ठेका मिळाल्यानंतर कामाची रक्कम वाढविली जाते.अंदाजीत असलेली रक्कम खर्ची घातली जाते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या दबावाखाली कार्यकारी अभियंता नियमांची पायमल्ली करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. हे प्रकार थांबले नाही तर या सगळ्याचा पंचनामा ‘होऊ दे चर्चा’अभियानातून करण्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स