ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवलीत रात्री खराखुरा ॲक्शन फाईट सीन ; पोलिसांची चाहूल लागताच काही फायटर पळाले तर काही तावडीत सापडले.

कणकवलीत रात्री खराखुरा ॲक्शन फाईट सीन ; पोलिसांची चाहूल लागताच काही फायटर पळाले तर काही तावडीत सापडले.

प्रकाशन: 07 Oct 2023 02:21 AM
वाचन संख्या 492

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या ओव्हरब्रिजखाली, काल शुक्रवारी रात्री उशीरा काहींचा खराखुरा फाईट सीन सुरू होता. यात एकाला मार लागला असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे. काही दक्ष नागरिकांनी याबद्दल पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकासह घटनास्थळी गेले.

पोलिसांची चाहूल लागताच काही फायटर तिथून पळाले तर काही हाती सापडले असे सूत्रांकडून समजते आहे.हाती सापडलेल्या संशयितांची ‘धिंड’ स्वरुपात पोलिस स्टेशनवर रवानगी करण्यात आली व हा सर्व प्रकार ओव्हरब्रिजखाली वाहन पार्किंग करण्यावरुन झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स