नाभिक समाजाचे स्वराज्य रक्षक नरवीर शिवरत्न जीवा महाले यांच्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : नाभिक समाजाचे शिव कालिन स्वराज्यरक्षक शिवरत्न नरवीर जीवा महाले यांचा जयंती उत्सव ९ ऑक्टोबरला नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने उत्सव व मिरवणुक अशा दुहेरी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीचे अध्यक्ष श्री विजय अप्पा पंडित, प्रदेश सचिव राजाभाऊ नगरकर व जिल्हाध्यक्ष देवीदास बिडवे यांनी आमदार सिमाताई हिरे व आमदार देवयानीताई फरांदे यांची नुकतीच भेट घेऊन या जयंती उत्सवाची निमंत्रण पत्रिका त्यांना दिली. या उत्सवात नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष श्री आप्पा विजय पंडित व पदाधिकारी तसेच सभासदांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)