कणकवली ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी वैभव धुमाळे तर उपाध्यक्षपदी शशिकांत तांबे आणि सचिव पदी वैभव ठाकुर.
महिला उपाध्यक्ष अर्चना लाड, कोषाध्यक्ष संजय कवटकर.
नवलराज काळे | सहसंपादक : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई. १३६ संघटनेच्या शाखा कणकवलीची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री.वैभव धुमाळे, उपाध्यक्ष पदी श्री.शशिकांत तांबे, महिला उपाध्यक्ष श्रीम.अर्चना लाड, सचिव श्री.वैभव ठाकूर, कोषाध्यक्ष श्री.संजय कवटकर, सहसचिव श्री.नितीन भाट, संघटक सिद्धेश गोसावी, श्रीम.तृप्ती पेडणेकर , श्री.विशाल वरवडेकर अशी नूतन कार्यकारिणीची निवड झाली.
यावेळी माजी अध्यक्ष आणि सचिव राजेंद्र सावंत,दीपक तेंडुलकर यांच्या उत्कृष्ट कामासाठी सत्कार करण्यात आला. तसेच नूतन कार्यकारिणीचा सत्कार कणकवली गटविकास अधिकारी, श्री अरुण चव्हाण विस्तार अधिकारी, श्री सूर्यकांत वारंग तसेच इतर मान्यवर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)