ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचेआयोजन.

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचेआयोजन.

प्रकाशन: 03 Oct 2023 07:20 PM
वाचन संख्या 120

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास चे योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार श्री मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप व मार्गदर्शक श्री किरण परांडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी सदर कार्यक्रमाच्या सुरवातीस कु. अपूर्वा कामत हिने प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले. मार्गदर्शक श्री किरण परांडेकर यांनी चारित्र्य मूल्यांचे महत्व आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मत व्यक्त केले. विविध कौशल्य विकास, संभाषण कौशल्य, बायोडाटा कसा लिहावा याचे त्यांनी प्रात्यक्षिक दिले आणि हे सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरले. या व अशा अनेक बाबींची माहिती या कार्यशाळेतून देण्यातआली. प्रश्न आणि संवाद हे सत्र घेण्यात आले. त्यास सर्व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री. वैभव नाईक, तसेच संस्थेचे सचिव श्री. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत, प्राचार्य डॉ. राजेश जगताप, विभागप्रमुख श्री. चंद्रशेखर बाबर, श्री. अमर कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख श्री. सचिन गोरड यांनी केले व आभार व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स