सडूरे - शिराळे ग्रामपंचायत सफाई कर्मचारी सुनील राऊत 'सफाई मित्र' पुरस्काराने सन्मानित ; स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत झालेला गौरव.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे कर्मचारी सुनील केशव राऊत यांना पंचायत समिती वैभववाडी स्वच्छ भारत मिशन ‘ग्रामीण स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत सफाई मित्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वैभववाडी तालुका गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी यांच्या वतीने सफाई मित्र सन्मान प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले. सुनील राऊत यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जनतेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)