कोकण कला व विकास संस्थेची 'कोस्टल क्लीन अप' मोहीम संपन्न.
बांदा | राकेश परब : दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण
कला व विकास संस्था गणपती विसर्जनानंतर समुद्र साफ सफाई करते. यावर्षी ही ‘कोस्टल क्लीन अप’ या उपक्रमांतर्गत दादरच्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता शनिवार दिनांक ३० सप्टेंबरला करण्यात आली.
येथे बसणारे पर्यटक यांनी केलेला कचरा, पीओपीच्या कचऱ्यात रूपांतरित झालेल्या गणरायाच्या मुर्त्या, प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी कचरा साहित्य जमा करून मनपाच्या घंटा गाडीला विल्हेवाट लावण्यासाठी रस्त्यावर आणून देण्यात आले.
यावेळी सालिना बुटेलो, श्वेता चोरगे, वंश खानविलकर, किशोर नाईक, आयुष आंग्रे, अंकित पराड, अभिजित रेडेकर, सुशील गोळे यांच्याबरोबर लोटस कॉलेजचे अनेक विद्यार्थ्यांनी साफसफाई मोहिमेत भाग घेतला. लोटस कॉलेज ऑफ ऑपटॉमेट्रीच्या प्रिन्सिपल डॉ. प्रेमा चंदे, स्वप्नाली दुभाषी आणि सलोमी कुरणे यांनी सहकार्य केले तर सुनील सैतावडेकर सहाय्यक महापालिका ‘जी उत्तर विभाग’ यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)