चिंदरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर वासुदेव घाडीगांवकर कालवश.
आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गांवचे ज्येष्ठ सन्माननीय नागरिक श्री मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे २८ सप्टेंबरला मुंबईत वार्धक्याने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सामाजिक कार्यासोबतच ते बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं, पत्नी, बंधू व नातवंडे असा परिवार आहे.
श्री मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांच्या निधनाने चिंदर परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)