विज्ञान नाटिका स्पर्धेत कासार्डे हायस्कूलचा तृतीय क्रमांक.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कासार्डे माध्यमिक विद्यालयाला तालुका स्तरावरील विज्ञान नाटिका स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला. नेहरु विज्ञान केंद्र बरळी- मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे येथील कै. वामनराव महाडिक विद्यालयात ही तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धा संपन्न झाली.
या नाटिकेत प्रत्युष पाताडे, वैदेही पाताडे, सानिका खराटे, गौरेश शिंदे, भार्गवी खानविलकर, दीपक कानडे, अश्मेष लवेकर, रिया सावंत यांचा सादरीकरण सहभाग होता. या विद्यार्थ्यांना श्यामसुंदर राणे, सविता पेडणेकर, रामचंद्र राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे आणि आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर संस्था पदाधिकारी, प्राचार्य एम. डी. खाड्ये, एन. सी. कुचेकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)