देवबाग वासीयांच्या आग्रहास्तव आज १५ सप्टेंबरला पुन्हा एक दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हरी खोबरेकर यांच्या वतीने देवबाग चर्च हॉल येथे आधार कार्ड व इलेक्शन कार्ड शिबीर..!
पहिल्या दिवशी मिळाला उत्तम प्रतिसाद.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांच्यावतीने आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. काल १४ सप्टेंबरला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी हे शिबीर आणखीन एक दिवस आयोजीत व्हावे असा आग्रह केल्याने आज शुक्रवारी १५ सप्टेंबरला पुन्हा देवबाग चर्च हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर पुढे चालू ठेवण्याचा निर्णय हरी खोबरेकर यांनी घेतला आहे.
आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती व नविन मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र दुरुस्ती यावेळी केली जाणार आहे. आधारकार्ड दुरुस्ती व नोंदणीसाठी ओरिजनल कागदपत्रे यासह नागरिकांनी उपस्थित राहावे व तसेच मतदान ओळखपत्र (इलेक्शन कार्ड) नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसहीत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व माजी जि प सदस्य श्री. हरी खोबरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)