मालवणात माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांची तत्परता ; साईडपट्टी कोसळलेल्या बांधकामाची पालिकेच्या माध्यमातून केली उभारणी.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथील सदाशिव सावंत यांच्या घरासमोरील मुख्य मार्गांवरील साईडपट्टी बांधकाम काही दिवसांपूर्वी कोसळले. याबाबत स्थानिक नागरिकांनी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांचे लक्ष वेधले. या ठिकाणी अपघाताची शक्यता लक्षात घेता तसेच आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कोसळलेले साईडपट्टी बांधकाम तात्काळ उभारणी व्हावे यासाठी यतीन खोत यांनी पालिका स्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून तत्परतेने सदर काम करण्यात आले आहे. याबाबत यतीन खोत यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.
स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सदाशिव सावंत यांसह अरुण भट, सुजाता ढोलम, मनीषा शेडगे, शांती तोंडवळकर, घोंगडे काका, मृणालिनी कांदळकर, दीपा पवार, दीक्षा जाधव, शरणाप्पा झेंडेकर आदी नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...