ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली एस टी स्टॅन्ड दोन दिवसांत खड्डे मुक्त करा अन्यथा आंदोलन ; युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा एस टी च्या अभियंत्यांना इशारा.

कणकवली एस टी स्टॅन्ड दोन दिवसांत खड्डे मुक्त करा अन्यथा आंदोलन ; युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा एस टी च्या अभियंत्यांना इशारा.

प्रकाशन: 14 Sep 2023 05:03 PM
वाचन संख्या 264

आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदार संघातील कणकवली, देवगड व वैभववाडी बसस्थानकांची दुरावस्था सुधारावी असाही दिला सल्ला.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली बस स्थानकाच्या अभियंत्यांना भेटून कणकवली बसस्थानकाच्या दूरावस्थेबाबत धारेवर धरले. येत्या गणेश चतुर्थीच्या पूर्वीच संपूर्ण एस टी स्टॅन्ड खड्डे मुक्त करावा अन्यथा ‘शिवसेना पद्धत’ दाखवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या ५० वर्षांत कणकवली बस स्थानकाच्या इमारतीचा विकास झालेला नाही. पालकमंत्री म्हणून राहिलेल्या नारायण राणे यांनी देखील हे काम करता आले नाही. तर आमदार नितेश राणे यांनी गेल्या ९ वर्षात केवळ राज्यभर बोंब मारण्याचे काम केले परंतु या मध्ये त्यांना कणकवली सह देवगड, वैभववाडी या बस स्थानकांचा देखील विकास करता आलेला नाही. त्यामुळे राज्यभर फिरण्यापेक्षा मतदारसंघातील सर्वसामान्य जनते करता वापरात येणाऱ्या बस स्थानकांच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्ला युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना दिला. कणकवली येथील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत युवासेना जिल्हाप्रमुख श्री नाईक यांनी तेथील एसटीच्या अभियंत्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच हे काम येत्या २ दिवसांत दुरावस्थेचे काम पूर्ण न झाल्यास युवासेनेमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल. सर्वसामान्य जनतेला गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे मुक्त बस स्थानक मिळाले पाहिजे. अन्यथा गय केली जाणार नाही असा देखील इशारा सुशांत नाईक यांनी दिला. यावेळी जोपर्यंत ठेकेदाराकडून निविदे प्रमाणे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये. तसेच केवळ दाखवण्या पुरते काम न करता एसटीच्या अधिकाऱ्यांनी जातीनिशी येथे थांबून काम करून घ्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ठेकेदार याच्याकडून एसटीची वाहतूक बस स्थानकामध्ये सुरू असल्याने सकाळच्या सत्रात काम करता येत नसल्याचे सांगितले. मात्र हे शासकीय काम आहे. लोकांच्या सेवेसाठी काम झाले पाहिजे. कारणे चालणार नाहीत. रात्रीच्या वेळी काम सुरू करा. अधिकाऱ्यांना उपस्थित राहायला सांगा. मात्र हलगर्जीपणा होता नये.
आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील बस स्थानकांची कामे आमदार नितेश राणे यांनी पहावीत व आपल्या मतदारसंघातील बस स्थानकांची अवस्था पहावी असा टोला देखील नाईक यांनी लगावला.

या भेटी प्रसंगी त्यांच्यासोबत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर, विभाग प्रमुख अनुप वारंग, मुकेश सावंत, राजू राठोड, रिमेश चव्हाण, नितेश भोगले, संतोष सावंत, महेश कोदे, सिद्धेश राणे, ललित घाडीगांवकर, एसटीचे अभियंता अक्षय केंकरे आदी उपस्थित होते.

फोटो सौजन्य : कणकवली ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स