ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
१५ ऑगस्ट नंतर मनसे चा पर्यावरण बचावा साठी मोर्चा

१५ ऑगस्ट नंतर मनसे चा पर्यावरण बचावा साठी मोर्चा

प्रकाशन: 31 Jul 2021 01:25 PM
वाचन संख्या 58

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : खास. विनायक राऊत यांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग रद्दची मागणी केली. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मायनिंग नकोच आहे परंतु सर्व राजकीय पुढाऱ्यांचे मायनिंग हे उत्पादनाचे साधन झाले. मायनिंगला पाठीशी घालण्याचे काम या लोकप्रतिनिधीकडून काम होत असून मायनिंगच्या विरोधात मनसेने यापूर्वी आवाज उठविला असतानादेखील कोणत्याही प्रकारची अधिकारी दखल घेत नसल्याने येत्या १५ ऑगस्टनंतर अपर जिल्हाधिकारी हटाव पर्यावरण बचाव असा मोर्चा आंदोलन मनसेच्या माध्यमातून उभारणार असल्याचा इशारा मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते.ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे डोंगर खचण्याचे प्रकार घडले आहेत .गाळेल येथे काल भेट दिली. त्याचप्रमाणे कळणे गावात भेट दिली असता जनतेचा लोकप्रतिनिधी विरोधात असलेला आक्रोश दिसून आला कळणे गावातील त्रासाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. कणकवली तालुक्यातील कासार्डे त्याप्रमाणे पियाळी या भागातही अशाच प्रकारची अवस्था आहे. पियाळी येथे 84 लाखाचा दंड होऊनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गौण खनिजाच्या http://localhost/news/public/uploads/2013 च्या नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता अधिकारी काहीही माहिती देत नाहीत असे सांगताना उपरकर म्हणाले, विनायक राऊत यांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग रद्द करा ही मागणी लावून धरली मात्र जोपर्यंत आम्ही मागणी केल्याप्रमाणे सिंधुदुर्गातील अप्पर जिल्हाधिकारी हे ठाण मांडून आपल्या जागेवर आहेत तोपर्यंत मायनिंग रद्द होणार नाही. या मायनिँग समर्थक अधिकाऱ्यांना का हटविले जात नाही? सत्ताधारी यामध्ये सामील आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे यासाठी या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा या मागणीसाठी 15 ऑगस्ट नंतर मनसेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही उपरकर यांनी दिला अप्पर जिल्हाधिकारी हटवा आणि पर्यावरण वाचवा ही आमची मागणी असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले.
मायनिंग विरोधात माझ्या 6 वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी वेळोवेळी आवाज उठविला मात्र मात्र सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी यांची हप्तेबाजी सुरू असल्याचे उपरकर म्हणाले. माय नेम विरोधात आता जनतेनेच पेटून उठण्याची वेळ आली आहे राज्यकर्ते आपल्या मदतीला येणार नाहीत याची जाणीव ठेवून जनतेने आंदोलन उभारावे असेही आवाहन यावेळी परशुराम उपरकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स