मालवणात माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या वतीने आयोजीत दोन दिवसीय 'आधार कार्ड' कॅम्पला आज पहिल्या दिवशी भरीव प्रतिसाद..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या वतीने आयोजीत ‘आधार कार्ड’ कॅम्पला आज सकाळी १० वाजता आरंभ झाला. मालवण शहरातील धुरीवाडा येथील सागरी महामार्गा जवळील हाॅटेल आराध्य येथे आयोजीत हे दोन दिवसीय शिबीर असून उद्या बुधवारी १३ सप्टेंबरला या शिबिराचा शेवटचा तथा दुसरा दिवस असेल.
आज पहिल्या दिवशी या आधार कार्ड कॅम्पमध्ये आधार कार्ड नोंदणी, आधार कार्डवर नांव तथा जन्मतारखेत दुरुस्ती, महिलांसाठी विवाहानंतर आधार कार्ड वरील नांव बदलणे तसेच ० ते १८ वयोगटातील नवीन आधार कार्ड नोंदणी अशा विविध प्रकारच्या आधार कार्ड संबंधीत प्रक्रीयेला नागरीकांचा उत्तम व भरीव प्रतिसाद मिळाला.
५५ नागरीकांनी पहिल्या दिवशी या कॅम्पचा लाभ घेतला असून इच्छुकांनी उद्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने आधार कार्ड संबंधीत प्रक्रीयेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)