ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माझी लढाई कोणाशी आहे याहीपेक्षा कोणाच्या पाठिशी उभे रहायचे ते माझी सर्व जनता ठरवणार आहे : आमदार वैभव नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माझी लढाई कोणाशी आहे याहीपेक्षा कोणाच्या पाठिशी उभे रहायचे ते माझी सर्व जनता ठरवणार आहे : आमदार वैभव नाईक.

प्रकाशन: 12 Sep 2023 04:23 PM
वाचन संख्या 199

आमदार वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्द म्हणजे विरोधकांशी संघर्ष आणि आव्हाने तरिही जनमानसात लोकप्रीय ; जिल्हा प्रमुख संदेश पारकर शिवसेना उ. बा. ठा. पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन.

आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, भाई गोवेकर व तालुका पदाधिकारी तसेच युवासेना, युवती सेना व महिला आघाडी पदाधिकारी बैठकीला उपस्थित.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक काल मालवण कुंभारमाठ येथील जानकी हाॅटेल संपन्न झाली. यावेळी संबोधीत करताना जिल्हा प्रमुख संदेश पारकर म्हणाले की विरोधकांशी संघर्ष आणि आव्हाने हीच आमदार वैभव नाईक यांची राजकीय कारकिर्द आहे व ती आव्हाने त्यांनी नेहमीच पेलली आहेत. पूर्वी काही लोक शिवसेना संवणार, मला परमेश्वर आला तरी हरवू शकत नाही अशा वल्गना करत होते त्यांचे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी संघर्षाच्या रूपाने पेलून ते लोकप्रिय आमदार म्हणून यशस्वी झाले. आज देखील शिवसेने फूट पडली तरी वैभव नाईक निष्ठावंत राहिले. कोणत्याही अमिषाला बळी पडले नाहीत हे सामान्य जनतेने डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे. गेल्या दिड वर्षाच्या कार्यकाळात राज्य सरकराने जिल्ह्यासाठी काय दिले हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आहे.


सरकारमधील मंत्री आणि राणेंकडून आमदार वैभव नाईक यांना कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला तरी तुमच्यासारख्या शिवसैनिकांच्या साथीने सर्व आव्हानांवर मात करून आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा यशस्वी होतील आणि कुडाळ मालवणची जनताही त्यांना साथ देईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त करत जिल्हाप्रमुख म्हणून मी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहीन असे सांगितले.

या बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मालवण शिवसेनेच्या वतीने संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीला संबोधीत करताना शिवसेना माजी जिल्हाप्रमुख व ज्येष्ठ नेते भाइ गोवेकर म्हणाले की वैभव नाईक हे आमदार झाल्यापासून सातत्याने मतदारसंघाच्या विकासासाठी झटत आहेत. प्रत्येक गांवात त्यांनी आपले काम उभे केले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा राणे केंद्रात मंत्री होऊन ४ वर्षे झाली त्याचबरोबर राज्यात दिड वर्षे राणे डबल इंजिन सरकारमध्ये सत्तेत असून देखील राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय दिले हे जाहीर करावे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती श्री शिवराजेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम कोणालाही जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी करून दाखवले. त्यामुळे छत्रपतींच्या आमच्या सारख्या मावळ्यांचा आणि शिवप्रेमींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे वैभव नाईक यांची कारकीर्द आणखी उज्ज्वल होणार आहे असे सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले की माझी लढाई कोणाशी आहे यापेक्षा कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे लोक ठरवणार आहेत. मी आमदार झाल्यापासून जनतेच्या हितासाठी जनतेत मिसळून काम करत आहे. थेट जनतेशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्या प्रश्न सोडवीत आहे. सत्ता असताना आणि नसताना देखील मतदार संघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. यापुढील काळातही माझे असेच प्रयत्न सुरु राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब, माजी नगरसेवक नितीन वाळके, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, गणेश कुडाळकर, अमित भोगले, भाऊ परब, बाळ महभोज, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे, शहर प्रमुख रश्मी परुळेकर, सिद्धेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख राजेश गांवकर, पेंडूर विभाग प्रमुख कमलाकर गावडे, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, भाई कासवकर, प्रशांत सावंत, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगूत, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, कांदळगाव सरपंच रणजित परब,मसुरे सरपंच संदीप हडकर,तळगाव सरपंच लता खोत, उदय दुखंडे,भाऊ परब, दीपक परुळेकर, किशोर कासले, शिवराम पालव,जयेश नार्वेकर, सतीश राठोड, प्रशांत भोजने, राहुल परब, राहुल सावंत, वायरी माजी सरपंच साक्षी लुडबे, सुर्वी लोणे, निनाक्षी शिंदे, करण खडपे, हीना कांदळगांवकर, आरती नाईक, संजना रेडकर आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स