'हटके वडा' फ्रॅन्चायझीचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन..!
कुडाळातील म्हाडेश्वर परिवाराच्या ‘हटके वडा’ व्यवसाय वाटचालीसाठी आमदार वैभव नाईक व मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात म्हाडेश्वर परिवाराच्या ‘हटके वडा’ फ्रॅन्चायझीचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर १२० पेक्षा जास्त आउटलेट असलेल्या ‘हटके वडा’ फ्रॅन्चायझीचा कुडाळमध्ये भव्य उद्घाटन सोहळा काल रविवारी संपन्न झाला.
भाग्यश्री म्हाडेश्वर, शुभम म्हाडेश्वर, यश म्हाडेश्वर यांनी हटके वडा फ्रेंचायझी कुडाळ येथील जिजामाता चौक डॉ.सौदत्ती कंपाउंड येथे सुरू केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, संजय भोगटे,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, ओंकार तेली , कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, वैश्य समाज सिंधुदुर्ग अध्यक्ष सुनिल भोगटे, एम.एस.आयु डॉ.गुरूप्रसाद सवदत्ती, बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक कुणाल कुमार ,पप्पू नाईक, गजानन वेंगुर्लेकर यांच्यासह कुडाळ मधील नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)