ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री देव बांदेश्वर – भूमिका देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी राजाराम उर्फ बाळू सावंत यांची निवड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री देव बांदेश्वर – भूमिका देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी राजाराम उर्फ बाळू सावंत यांची निवड

प्रकाशन: 08 Sep 2023 05:21 PM
वाचन संख्या 38

बांदा l राकेश परब : देवस्थान व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार खास ग्रामसभेत आज श्री देव बांदेश्वर – भूमिका देवस्थान उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राजाराम सावळाराम सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली. या सभेसाठी ३५० हून अधिक नागरिक उपस्थित होते.
देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सावंतवाडी उपकार्यालयाकडून देवस्थानची स्थानिक व्यवस्था पाहण्यासाठी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ५६ अन्वये स्थानिक सल्लागार उपसमिती नियुक्ती करण्याचे निर्देश ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार बांदा ग्रामपंचायत सभागृहात खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, राजाराम सावंत, रत्नाकर आगलावे, साई काणेकर, रुपाली शिरसाट, शुभलक्ष्मी सावंत, तनुजा वराडकर, शिल्पा परब, रिया येडवे, देवल येडवे, रेश्मा सावंत, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये उपस्थित होते.
श्री बांदेश्वर – भूमिका देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष राजाराम सावळाराम सावंत, सचिव – सचिव घनश्याम कृष्णा सावंत, सदस्य शंभुराव विवेक देसाई, रामदास परशूराम सावंत, गुरुनाथ गोविंद मेस्त्री, जयप्रकाश जनार्दन सावंत, वासुदेव विजय भोगले, प्रितेश नारायण शेटकर, आत्माराम लक्ष्मण बांदेकर, गोविंद केशव सावंत, रामा वासुदेव बांदेकर, आनंद महाजन, संतोष नारायण बांदेकर, सतिशचंद्र सोनू मोर्ये व विश्राम आत्माराम कानसे अशी १५ सदस्यीय समितीला ग्रामसभेने मान्यता देण्यात आली. यावेळी श्री देव मठपर्वत देवस्थान सल्लागार उपसमिती नियुक्तीला सभेने मान्यता दिली. सदर समिती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – महादेव शंकर वसकर, सचिव सुरज सुरेश मांजरेकर, खजिनदार – जीवबा भरत वीर, सदस्य विवेक विष्णू केळुसकर, सखाराम वसंत म्हावळंकर, दिवाकर अंकुश म्हावळंकर, सुप्रिया सुभाष नाईक, विठ्ठल तांबुळकर व महेंद्र बाळकृष्ण मांजरेकर.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स