ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
बांदा येथे सकल मराठा समाज बंधू-भगिनींनी काढली भव्य निषेध बाईक रॅली
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा येथे सकल मराठा समाज बंधू-भगिनींनी काढली भव्य निषेध बाईक रॅली

प्रकाशन: 07 Sep 2023 07:57 PM
वाचन संख्या 46


बांदा /राकेश परब : जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज बांदा येते सकल मराठा बंधू-भगिनींनी भव्य बाईक रॅली काढली. यामध्ये शेकडो मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील झाले होते. सकाळी अकरा वाजता बांदेश्वर मंदिर येथून ही बाईक रॅली निघाली. शहरातील मोर्येवाडा, तेली तिठा, उभा बाजार, गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड मार्गे गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील सरोटे गावात मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केला. संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही प्रत्येक गावागावातून या घटनेचा निषेध करत आहोत. मराठा समाजाची किंमत आणि हिम्मत आम्ही मराठ्यांवर लाठीहल्ला करून रक्त सांडणाऱ्यांना दाखवून देऊ, असे बाळू सावंत यावेळी म्हणाले.
मराठा समाजाचे सचिव म. गो. सावंत यांनी यावेळी बोलताना, राज्यकर्त्यांनी त्वरित निर्णय घेऊन व विषेश अधिवेशन बोलून मराठा आरक्षणासाठी ठराव पास करावा. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा शासन निर्णय त्वरित काढून, मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली.
या बाईक रॅलीमध्ये राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, ज्ञानेश्वर सावंत, गुरु सावंत, स्वप्निल सावंत, विराज परब, साई सावंत, मिलिंद सावंत, जयवंत राणे, विहान राणे, परिमल सावंत, सागर सावंत, मकरंद तोरस्कर, राकेश परब, मयूर चराटकर, दीपक सावंत, संतोष नांदगावकर, सचिन आईर, राजन सावंत, राजा मोर्ये, सर्वेश मोर्ये, निलेश पटेकर, जय पटेकर, शामसुंदर धुरी, रत्नाकर आगलावे, श्याम सावंत, अमेय गवस, जयेश सावंत, प्रथमेश पडवळ, राजू देसाई, श्रीधर सावंत, घनश्याम सावंत, संदेश महाले, महेश मोर्ये, अमेय गवस, हेमंत दाभोलकर, संदेश शेगडे, गणेश सावंत, यश माधव, उर्मिला मोर्ये, जय सावंत, अशोक परब, विनेश गवस, सुचिता धुरी, नितीन राऊळ, अल्पिता गाड, विनिता रायकर, सौ. अर्चना सावंत, शिल्पा सावंत, आकाश देसाई, लक्ष्मी गोविंद सावंत, राखी कळंगुटकर, माधवी गाड, लक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत यांच्यासह वाफोली, डिंगणे, शेर्ले, इन्सुली व परिसरातील बहुसंख्य मराठा बांधव या बाइक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स