ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कोकण संस्थेने उघडली मावळातील महिलांसाठी उपजीविका निर्मितीची गेट
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोकण संस्थेने उघडली मावळातील महिलांसाठी उपजीविका निर्मितीची गेट

प्रकाशन: 03 Sep 2023 12:58 PM
वाचन संख्या 47

बांदा : राकेश परब: सिगेट कंपनीच्या सहयोगातून मावळ तालुक्यातील २१ गरजू महिलांना व्यवसायाची संधी कोकण कला व शिक्षण विकास संस्था महिला सक्षमीकरण या विषयावर गेले अनेक वर्षे काम करत असून महिला सबळ झाल्यास कुटुंब सक्षम होऊ शकते या उद्देशाने महाराष्ट्रात काम करत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या तालुक्यात आतापर्यंत संस्थेने शेकडो महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले असून त्यातील २१ गरजू महिला सिगेट कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कूल प्रकल्पांतर्गत २ महिने टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगचे उच्च दर्जाचे ट्रेनिंग, व्यक्तीमत्व विकास, खरेदी विक्री कौशल्य, स्वयंरोजगार आणि व्यवसाय वृद्धी असे अनेक कौशल्य देऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी महिलांना शिलाई मशीन व किट उपलब्ध करून देण्यात आले.

रिंकू सभागृह, कामशेत येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक महिलेला शिलाई मशीन मशीन, किट व सर्टिफिकेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बिसलरी कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक श्री विठ्ठल कुंभार, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक बापू माने, प्रीती पांगे, साक्षी पोटे, बिना अहिरे व शिक्षिका सौ वृंदा बालगुडे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोकण संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून मावळवासीयांच्यावतीने मी संस्थेचे आभार मानतो अशा शब्दात श्री प्रदीप पवार यांनी संस्थेच्या कामाची स्तुती केली.सिगेट कंपनी आणि कोकण संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे आम्ही सोनं करून आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने मावळ तालुक्याच्या विकासात योगदान देऊ असे आश्वासन लाभार्थी प्रियांका काजळे यांनी यावेळी सर्वांच्या वतीने दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बापू माने यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स