आमच्या कालावधीमध्ये मालवण नगर परिषद कार्यालय आणि परिसर सुशोभीकरण करता आले याचे समाधान
ब्युरो न्यूज : ज्या नगरपालिकेमध्ये 21 वर्ष कर्मचारी म्हणून काम केले त्या नगरपालिकेत जेव्हा नगराध्यक्ष म्हणून जाण्याची संधी मिळाली त्यावेळी अनेक वर्षापासुन मनामध्ये नगरपालिका इमारत आणी परिसर सुशोभीत करण्याची सुप्त इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली या बद्दल समाधान वाटत आहे.
सन http://localhost/news/public/uploads/2018-19 मध्ये पहिल्या प्रथम वैशिष्ट्य पूर्ण योजनेतुन् 66.37 लाख रुपयेचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन नगर पालीका इमारतीच्या बाह्य भागावर ACP (aluminium composit pannel) बसवून त्याच सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे नगरपरिषद इमारतीला एक नवीन रूप प्राप्त झाले. या इमारती प्रमाणे त्याच्या सभोवतीचा परिसर पण आकर्षक दिसावा म्हणून सुवर्ण जयंती योजना जिल्हास्तर मध्ये सन http://localhost/news/public/uploads/2020-21 मध्ये 74.76 लाखाचा प्रास्तव सादर करून प्रशासकीय मंजुरि घेण्यात आली. यामध्ये प्रवेश द्वार, वॉचमन केबिन, रंगीत कारंजा, आकर्षक गार्डन, संपूर्ण परिसरात पेवरब्लॉक, नगरपरिषदेच्या वाहनाना पार्किंग साठी मोठ्या शहरा प्रमाणे आकर्षक पार्किंग व्यवस्था , गार्डन लाईट , संपूर्ण नगरपरिषद आवरा भोवती कंपाऊंड वॉल इत्यादी कामाचा समावेश करण्यात आला. ही कामे आता पूर्णत्वाकडे आल्याने आता नगरपालिकेला आकर्षक रूप आलेले आहे.
याबरोबरच मालवण नगर परिषद कार्यालय आतील कर्मचारी बैठक व्यवस्था , लोकप्रतिनिधि साठी केबिन, नगर परिषद सभागृह यांचे पण प्रस्ताव तयार करण्यात आले होते पण या साठी लागणारा निधी आमच्या कालावधीत प्राप्त न झाल्याने ती कामे करता आली नाही.
तरीपण नगरपरिषद इमारत आणी परिसर सुशोभीकरण मुळे मालवण नगरपरिषद इमारत आकर्षक बनवता आली याचं मानसिक समाधान मिळाले.
महेश कांदळगावकर
माजी नगराध्यक्ष
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)