ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित : आ. वैभव नाईक.संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार मागणी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित : आ. वैभव नाईक.संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार मागणी

प्रकाशन: 01 Sep 2023 07:27 PM
वाचन संख्या 154

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय समित्यांवर सदस्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा पालकमंत्र्यांचा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र याउलट परिस्थिती आहे. भाजपचे लोक परस्पर पत्रे देऊन नेमणुका करून घेत आहेत.त्यामुळे इतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना वेगळे अधिकार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना वेगळे अधिकार आहेत का? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. आ. वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून तसे होताना दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झेंडावंदन करण्याचा अधिकार दुसऱ्याच मंत्र्यांना दिला जातो. शासकीय समित्यांवर दुसऱ्याच्याच शिफारशीने नियुक्त्या होत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे जिल्हा नियोजन बैठकीचेच अधिकार आहेत काय?

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीची नेमणूक भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार करण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अधिकारावर एकप्रकारे गदा आली आहे. भाजपच्या लोकांचे कामगार असल्याप्रमाणे जिल्हा प्रशासन काम करीत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपण राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचेही आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स