इन्सुलीत उद्या सावंतवाडी तालुका दशावतारी बहुउद्देशीय संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या इन्सुली येथे उद्या शुक्रवारी १ सप्टेंबरला ‘सावंतवाडी तालुका दशावतारी बहुउद्देशीय संघ’ यांच्या वतीने उ श्री देवी माऊली मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यात सायंकाळी ४.०० वाजता दहावी, बारावी व विशेष नैपुण्य प्राप्त दशावतारी मुलांचा सत्कार सोहळा तसेच सावंतवाडी तालुक्यातील जेष्ठ दशावतारी कलाकारांचा सन्मान होणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता सावंतवाडी तालुक्यातील संयुक्त दशावतार कलाकारांचा ‘पिंडदान’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी तालुका दशावतारी बहुउद्देशीय संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)