बांदा पतंजली योग समितीच्या वतीने रक्षाबंधन संपन्न.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीच्या वतीने येथील आनंदी मंगल कार्यालयात नियमितपणे सकाळी ५.३० ते ७.००या वेळेत योगवर्ग चालू असतात. या पतंजली योग वर्गात भारतीय सण समारंभ साजरे करण्यात येतात. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने योगवर्ग महिला साधकांनी पुरूषांना राख्या बांधून औक्षण केले व सर्वांना मिठाईचे वाटप केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर व बांदा पतंजली योग समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)