ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नवनाथ झोरे हे स्वयंघोषीत पुढारी असून खुद्द मालवण तालुक्यात त्यांना कोणी ओळखतही नाही ; भाजप भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांची झणझणीत टीका.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नवनाथ झोरे हे स्वयंघोषीत पुढारी असून खुद्द मालवण तालुक्यात त्यांना कोणी ओळखतही नाही ; भाजप भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांची झणझणीत टीका.

प्रकाशन: 29 Aug 2023 10:12 AM
वाचन संख्या 278

घर काचेचे आहे की मातीचे हे महत्वाचे नसून समाजासाठी आपण काय करतो ते महत्वाचे असल्याचा सुशील खरात यांचा नवनाथ झोरे यांना प्रतिटोला..!

आमचे नेते बाळा गोसावी यांच्यावर टीका करायचा नवनाथ झोरे यांना अधिकार नसून झोरेंनी आधी आमदार वैभव नाईक यांच्याकडून निदान स्वतःच्या वाडिचा तरी विकास करुन घ्यावा असा दिला सल्ला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात सध्या भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील शब्द संघर्ष विविध स्तरावर सुरु आहे. परवा भाजपच्या बाळा गोसावी यांनी केलेल्या टीकेला काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांनी प्रत्युत्तर दिले होते त्यानंतर यात आता भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांनीही त्यांचे टीकास्त्र सोडले आहे.

खरात यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की, स्वयं घोषित पुढारी नवनाथ झोरे यांनी बाळ गोसावी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांच्याकडून स्वतःच्या वाढीचा विकास तरी करून घ्यावा. आधी स्वतःच्या घरी जाण्याचा रस्ता बनवावा नंतर मालवण तालुक्यातील धनगर वस्तीच्या विकासाबाबत बोलावे. नवनाथ झोरे यांना तालुक्यात किती धनगर वस्त्या आहेत याची तरी माहिती आहे का..? माहिती असेल तर जाहीर करावी असे आवाहन सुशील खरात यांनी केले आहे. बाळा गोसावी जरी काचेच्या घरात रहातात तरी देखील धनगर समाजासाठी त्यांच्या विकासासाठी रस्त्यावर उतरतात या सर्व गोष्टीला जनता साक्षी आहे. बाळा गोसावी यांच्याकडे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुका अध्यक्ष पद असताना तालुक्यातील धनगर वस्त्यांवरती भेटी गाठी घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्यावर होणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशा प्रकारचे अनेक विषय हात घेऊन त्यांनी जनजागृती केली आहे. धनगर समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विविध विभागाकडे नागपूर येथे झालेल्या भटके विमुक्त आघाडीच्या अधिवेशनात पत्रव्यवहार करत धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात, धनगर समाजाला राजकीय क्षेत्रात स्थान मिळण्यासाठी देखील आवाज उठवला आहे. अशा व्यक्ती वरती टीका करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. ओवळीये धनगरवाडी येथे स्फोटके वस्तीला धोका पोहोचवण्यात येत होता त्यावेळी तुम्ही कुठे होता नवनाथ झोरे कुठल्या बिळात लपून बसले होते. धनगर समाजाच्या जीवाचे रक्षण करण्याकरिता बाळा गोसावीच देवदूत म्हणून धावले होते.

नवनाथ झोरेंना मालवण तालुक्यात कोण ओळखते व त्यांनी धनगर समाजासाठी काय केले हे पुराव्यानिशी सिद्ध करावे असा थेट सवाल सुशील खरात यांनी केला आहे.

मालवण तालुक्यात तुम्ही एकटेच धनगर समाजाचे शिवसेना सदस्य असाल पण भाजपमध्ये तालुक्या सहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले धनगर समाजाचे सरपंच आहेत. निवडून आलेले उपसरपंच आहेत व सदस्य आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुक्यात सभापती उपसभापती तर आता विद्यमान नगरसेवक नगरपंचायत सभापती पदावर देखील धनगर समाज बंधू-भगिनींना संधी मिळाली आहे. तालुक्याचे संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कुठेही असे दिसून येत नाही. वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून धनगर समाजाला सापत्न वागणूक मिळाली आहे याचे जिवंत उदाहरण स्वतः तुम्हीच आहात. तुम्ही आमदार वैभव नाईक यांच्या पाठिंब्यावरती जर निवडून आला होता तर मग ग्रामपंचायत ची सत्ता तुमच्या आमदारांच्या हाती असताना देखील तुम्हाला उपसरपंच पद का दिले नाही याचे उत्तर देखील प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून जनतेला द्या. यावरून आपली पात्रता काय ती आपण ओळखावी आपण आरशासमोर उभे राहून आपण कोण आहोत याच आत्मपरीक्षण झोरे यांनी करावं आणि भाजपा नेते बाळा गोसावी यांच्यावर टीका करावी. समाजाच्या समस्या सोडवण्याकरिता काचेचे किंवा मातीच्या घराची आवश्यकता नसून समाजप्रती असणाऱ्या प्रेमाची आणि समजा सेवेची आवड असण्याची गरज असते. गोसावी यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे व याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत तुम्ही एखाद्या जरी धनगर वस्ती वरती गेला असल्याचा पुरावा आम्हाला द्यावा. उगाच उचलली जीभ की लावणी टाळ्याला कोणतरी सांगतो म्हणून प्रसिद्ध पत्रक देऊन कार्य करणाऱ्या व्यक्ती वरती टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा खटापोप झोरे यांनी करू नये. धनगर समाजाला सापत्न वागणूक शिवसेना उद्धव गटांकडून कायमस्वरूपी मिळालेली आहे तालुक्यातील धनगर समाज विकासापासून वंचित असण्याचे कारण आमदार वैभव नाईक आहेत अनेक धनगर वस्तीवर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीतून रस्ते मंजूर करावे लागत होते. ७ वर्षे सत्ताधारी आमदार असून देखील एकाही धनगर वस्ती वरती आमदार फंड का दिला नाही..? काळसे धनगरवाडा, हिवाळे धनगरवाडा, वेरली धनगर वाडा ओवलिये धनगरवाडा, असरोंडी धनगरवाडा अशा अनेक धनगर वस्ती आहे जिथे अद्याप रस्ता नाही काही ठिकाणी स्मशानभूमी नाही हे सत्य आहे. काम चुकार नेत्यांची चमचेगिरी सोडून समाजसेवा करा समाजाचे प्रश्न मांडा. अनेक ठिकाणी धनगर समाज भीतीचे वातावरणात जगत आहे आणि याकरता अनेक वेळा बाळा गोसावी समाजाला धीर देत समाजाला साथ देत समाजाच्या प्रश्नांवरती आवाज उठवत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या धनगर समाजाचा विकास होईल. त्यामुळे आमचे नेते गोसावी यांच्यावर टीका केल्यास आम्ही गप्प नाही असा इशारा सुशील खरात यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून झोरे यांना दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स