ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भारताचा चालला भाला आणि झाला सुवर्ण ऐतिहासिक बोलबाला ; नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक मध्ये भारतासाठी आणले पहिले सुवर्णपदक..!

भारताचा चालला भाला आणि झाला सुवर्ण ऐतिहासिक बोलबाला ; नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक मध्ये भारतासाठी आणले पहिले सुवर्णपदक..!

प्रकाशन: 28 Aug 2023 06:28 AM
वाचन संख्या 161

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दिली कडवी टक्कर..!

सुयोग पंडित | क्रिडा : हंगेरी बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतीक ॲथलेटीक्स खेळात आज भारतासाठी ऐतिहासिक आनंद प्राप्त झाला असून भारतीय गोल्डन बॉय नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीत इतिहास रचला आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारताच्या या लाडक्या प्रतिभावंत खेळाडू नीरजने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल ॲथलेटिक्स सेंटरमध्ये 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. अंतिम फेरीत एकूण ६ प्रयत्न झाले असून नीरजने दुसऱ्या फेरीपासून गुणतालिकेत आघाडी कायम ठेवली होती परंतु अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्याचा पहिलाच थ्रो फाऊल झाला. पहिल्या प्रयत्नानंतर नीरज एकूण १२ फायनलिस्टमध्ये शेवटच्या स्थानावर होता. कारण पहिल्या थ्रो मध्ये फाऊल करणारा तो एकमेव होता असे असूनही नीरज निराश झाला नाही आणि तिने त्याच्या पुढच्याच प्रयत्नात जबरदस्त पुनरागमन केले. नीरजच्या दुसऱ्या थ्रोमध्ये, भाला थेट ८८:१७ मीटर अंतरावर पडला आणि यासह नीरजने पहिल्या क्रमांकवर कब्जा केला. नीरजची ही आघाडी तिसऱ्या प्रयत्नानंतरही कायम राहिली आणि ८६ :३२ मीटर फेक करूनही तो पूर्वार्धात पहिल्या स्थानावर राहिला.

दुसरीकडे पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही संथ सुरुवातीनंतर पुनरागमन केले. अर्शदचा पहिला थ्रो ७४:८० आणि दुसरा ८२:८१ मीटर होता. नदीमने पुन्हा तिसऱ्या थ्रोमध्ये ८७:८२ मीटरचे अंतर पूर्ण केले. नीरजनंतर दुसरे स्थान पटकावले आणि रौप्य पदक जिंकले.

त्याच वेळी, भारताच्या डीपी मनूने तिसऱ्या प्रयत्नात ८३:७२ मीटरची थ्रो केली, तर किशोर जेनाने दुसऱ्या थ्रोमध्ये ८२:८२ मीटरचा टप्पा गाठला. अशाप्रकारे, दोन्ही भारतीय देखील टॉप-८ मध्ये राहिले आणि त्यांना दुसऱ्या हाफमध्ये स्थान मिळवता आले, जिथे त्यांना आणखी ३ थ्रो मिळाले. प्रत्येक मोठ्या चॅम्पियनशिप आणि इव्हेंटमध्ये पदक जिंकण्याची सवय लावलेल्या नीरजने भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेला पराक्रमही केला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २ पदके जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला. नीरजने गेल्या वर्षी युजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात नीरजने शुक्रवारी ८८:७७ मीटर फेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या कामगिरीच्या जोरावर तो पुढील वर्षी पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. ही त्याची मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आणि एकूण चौथी कामगिरी ठरली.

गेल्या वेळी नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. २५ वर्षीय भारतीय स्टार ॲथलीटने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. २०१८ मधील आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याने गेल्या वर्षी डायमंड लीगही जिंकली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स