किनारपट्टीतील लोकांचे मच्छिमारांचे नेतृत्व हरी खोबरेकर हे झंझावाती तालुकाप्रमुख ; माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी देवबागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य श्री. हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ लढविणे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले गौरवोद्गार.
महिला व छोट्या मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;महिलांमध्ये श्रद्धा लोणे ठरल्या विजेत्या तर रमिता येरागी द्वितीय व वैशाली मोंडकर तृतीय.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथे काल २६ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य श्री. हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व छोट्या मुलींसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख श्री. भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नारळ लढविणे स्पर्धेस महिला व छोट्या मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत महिलांमध्ये श्रद्धा लोणेला प्रथम क्रमांक, रमिता येरागी द्वितीय क्रमांक, वैशाली मोंडकर तृतीय क्रमांक प्राप्त झाले. छोट्या मुला – मुलींमध्ये वैभव लोंढे प्रथम क्रमांक, किंजल वालावलकर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत पुरस्कृत साडी लकी ड्रॉ मध्ये कल्पना चोडणेकर व अन्य महिला विजयी ठरल्या.
यावेळी उद्गाटक मान्यवर भाई गोवेकर म्हणाले किनारपट्टीतील लोकांचे मच्छिमारांचे नेतृत्व हरी खोबरेकर हे ‘झंझावाती तालुकाप्रमुख’ अशा शब्दांत त्यांचे विशेष कौतुक केले. पूर्वी पुरुषांच्या स्पर्धा होत असत आता मात्र चित्र बदलले आहे. आता महिला युग आले असून महिलांच्या स्पर्धा होत असताना दिसतात. हा कार्यक्रमाचे सर्व श्रेय देवबाग मधील भगिनींचे त्यांनी पुढाकार घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याऱ्या सर्व महिला आघाडी, युवतीसेना, शिवसेना , सर्वांचे अभिनंदन केले व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ दशावतार कलाकार तथा झी गौरव पुरस्काराने सन्मानित नटसम्राट मा.श्री. जीजी चोडणेकर म्हणाले ही स्पर्धा ‘न भूतो न भविष्यति’ कारण याच्या पूर्वी पुरुषांच्या स्पर्धा अस चित्र पाहिले. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायका रणरागिणी म्हणून या ठिकाणी उतरल्या आहेत आणि त्या सुद्धा कशा होत्या व आगामी येणाऱ्या रणरागिणी आणि अस्ताकडे झुकत चाललेल्या रणरागिणी सहभागी होत्या. मला जास्त कौतुक अस्ताकडे जाणाऱ्या रणरागिणी उमेदीने सहभागी झाल्या त्याचे वाटले. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले झी गौरव पुरस्कार सन्मान नटसम्राट श्री.जीजी चोडणेकर यांचा हा सन्मान देवबाग वासीयांबरोबरच सर्व मालवण वासीय आणि सर्व दशावतार कलावंतांचा सन्मान आहे. पक्ष भिन्न जरी असले तरी माझी आणि पास्कॉल रोड्रिग्ज यांचे मत एक आहे ते म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये सहभागी होणे. आजचा कार्यक्रम हा महिलांनी एकत्रित येऊन संघटित व्हावे व त्याच्यासाठी एक विरंगुळा म्हणून नारळी पौर्णिमा हा सण माझ्या महिला भगिनींनी साजरा करायला पाहिजे. आज माझ्या भगिनींच्या इच्छेनुसार व खासदार साहेब, आमदार साहेब यांच्या संकल्पनेनुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माझी सुरुवात वायरी गावातून झालो पण मी उदयास आलो ते देवबाग श्री देव मोबरेश्वर मंदिर ते चौके श्री देवी भराडी माता मंदिरापर्यंत उभा राहिलो. हे सर्वसामान्य लोकांचे आशिर्वाद आहेत. शिवसेना प्रेमी तर हा गाव आहेच व यापुढे राहील. माझ्या जिल्ह्या परिषदेच्या कार्यकाळात जी विविध आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचे काम शिवसेना खासदार, आमदार, माझ्या मार्फत करण्यात आली आणि यापुढे पण करण्यात येतील. आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून देवबाग- तारकर्ली-वायरी रस्ता पूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात यशस्वी ठरलो. आजसुद्धा सिद्धेश्वर मंदिराच्या पुढील रस्ता आहे त्याचे काम पूर्ण पावसाळ्यानंतर करण्यात येईल.बंधारा प्रश्न होता. मोबार येथे रुपये ४ कोटी बंधाऱ्याचे काम चालू आहे. १९० मीटर बंधाऱ्याचे काम याठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जिओ ट्यूबच्या माध्यमातून किनारा वाढवण्यासाठी व किनाऱ्याला चे संरक्षण देण्यासाठी रुपये अडिच कोटीचा बंधारा मजूर झाला होता पण प्रथम दर्शनी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केले होते ते दुय्यम दर्जाचे काम केले होते त्याचे कॉन्ट्रॅक्ट काढून घेऊन त्याठिकाणी एक चांगला बंधारा घालण्याचे काम खासदारसाहेब, आमदार साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले. खाडी किनारी सुमारे बंधाऱ्यासाठी रुपये ८ कोटी मंजूर आहेत. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर जवळपास १३०० मीटर बंधाऱ्याच्या कामास सुरवात होईल. पाण्याचा मोठा प्रश्न जळजीवन माध्यमातून आमदार साहेबांनी एका गावाची पूर्तता न करता अनेक गावांसाठी सुमारे ८ कोटी रुपये पाण्याच्या योजनेसाठी दिले. त्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले असून कुंभारमाठ पॉलिटेक्निक येथून वायरी, तारकर्ली, देवबागसाठी मुख्य प्रवाह चालू करण्यात येईल व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी यशस्वी ठरलो. ही जी कामे , उपस्थित प्रश्न मी जिल्हा परिषद सदस्याच्या काळात यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे काम झाले हे माझे भाग्यच असेही खोबरेकर म्हणाले. मच्छिमार बांधवांचे प्रश्न, तौक्ते, कॅर चक्रीवादळामध्ये मच्छिमारांना मदत मिळवून देण्यास यशस्वी झालो. आरोग्याच्या समस्या दूर करण्यात आल्या. यासर्व कामे करताना पक्षप्रमुख उद्धव साहेबांसारखे नेतृत्व, खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, भाई गोवेकर नेहमीच आमच्या पाठीशी आहेत. खासदार साहेबांनी महत्वाचा कमी विद्युत दाबाचा प्रश्न व भूमिगत वहिनीच्या झाल्या पाहीजे यासाठी मंजूर केला. कमी विद्युत दाबाचा प्रश्नासाठी माझ्या बंधू भगिनींनी ३५४ कलमा सारखे केसेस अंगावर घेतल्या त्याला न्याय देण्यासाठी किनारपट्टीत भूमिगत वीज वहिन्या कार्यान्वित होतील.तसेच खासदार साहेबांमार्फत मोबाईल टॉवर पहिल्या वेळी सर्वात पहिल्या १० मध्ये मंजूर होऊन जागेअभावी मागे गेला पुनःश्च पाठपुरावा करून परत आणण्याचे काम व पर्यटन सुविधा शिवसेनेमार्फत पूर्ण केल्या जातील. तसेच सर्व पदाधिकारीनी चांगल्या पध्दतीचे काम केले स्पर्धा यशस्वी करणयासाठी मेहनत घेतली त्याचे आभार. येणाऱ्या काळात महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्याच्या प्रयत्न करु तसेच पर्यटन गाव असल्याने गावाचा विकास कसा होईल याकडे निश्चितपणे लक्ष देऊ व त्यांनी सर्वाना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब म्हणाल्या प्रत्येक महिलांनी चार भिंतीत न राहता, चूल आणि मूल एवढंच न सांभाळता स्वतः काहीतरी करून दाखवावे आणि दुसरी महिला भगिनी काहीतरी करत असतील तर त्यामध्ये भाग घेऊन सहकार्य करायचे असे उद्दिष्ट ठेवा. डॅशिंग आमदार यांनी चांगल्या कामासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही असेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे हरी खोबरेकर याचे कौतुक केले व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवती सेना प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत म्हणाल्या या खेळाला न्याय मिळाला कारण हा खेळ आता महिला प्रधान झाला असून मी समस्त उपस्थित माऊलींकडून हरी खोबरेकर यांचे आभार मानते. नेहमी संघर्षाच्या काळात पक्षाची साथ न सोडलेले नेतृत्व भाई गोवेकर, श्री. हरी खोबरेकर हे देवबाग वासीयांची पण साथ नक्कीच सोडणार नाही अशी आशा व्यक्त केली व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पूनम चव्हाण म्हणाल्या महिलांनो ह्या संधीचे सोने करणे महत्त्वाचे आहे. आम्ही सर्वसामान्यामधील महिला होतो आज पक्ष्याच्या माध्यमातून आम्हाला हक्काचे व्यासपीठ मिळाले. पुढे जाण्यासाठी तुमच्यातील महत्वाकांक्षा त्याच बरोबर आशा तसेच स्वप्न महत्त्वाची आहेत असा संदेश त्यांनी महिलांना दिला. तसेच सर्व सामान्य मच्छिमार कुटुंबातील मुलगा ग्राम पंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य त्याच बरोबर एक जबाबदार तालुकाप्रमुख आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पैशाचा मोठेपणा नव्हता फक्त जे होते ते सर्व सामान्यांबद्दल असलेली तळमळ आणि त्याच्या मागे असणारे प्रेम त्यामुळे ते तुमच्या प्रेमामुळे येथे आहेत. खरेतर हरी खोबरेकर हे तुमच्या मतदार संघात लाभलेला तारा आहेअश्या शब्दात त्यांनी हरी खोबरेकर यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा प्रमुख श्री. भाई गोवेकर, जेष्ठ दशावतार कलाकार श्री.जीजी चोडणेकर, महेश सामंत , शिवसेना महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला आघाडी मालवण तालुका संघटक दिपा शिंदे, महिला आघाडी मालवण तालुका संघटक श्वेता सावंत, युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक शिल्पा खोत, शिवसेना महिला आघाडी मालवण तालुका समन्वयक पूनम चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य पास्कल रॉड्रीग्ज, संगिता वेंगुर्लेकर, सुप्रिया केळुसकर, देवबाग संपर्क प्रमुख तथा मालवण उपशहर प्रमुख सन्मेश परब, युवतीसेना मालवण तालुका अधिकारी निनाक्षी मेतर, युवतीसेना मालवण उपतालुका अधिकारी हिना कांदळगांवकर, मालवण विभाग अधिकारी चंदू खोबरेकर, युवतीसेना मालवण शहर अधिकारी सुर्वी लोणे, युवतीसेना मसुरा विभाग अधिकारी आर्या गांवकर, युवतीसेना मालवण उपशहर अधिकारी माधुरी प्रभू, तारकर्ली शाखाप्रमुख आबा केळुसकर, उपविभाग समन्वयक राजू मेस्त्री, मनोज खोबरेकर, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर,शाखा प्रमुख रमेश कद्रेकर, शाखाप्रमुख अक्षय वालावलकर, शाखा प्रमुख मोहन कांदळगांवकर, वैभव खोबरेकर, शांती तोंडवळकर, उपशाखा प्रमुख गणपत राऊळ, गजानन मांजरेकर, दांडी शाखाप्रमुख हेमंत मोंडकर, दपर्णा केळुसकर-राऊळ, करण खडपे, स्वरा रोगे, अंकिता मालंडकर, शिल्पा खवणेकर, प्रिया धुरी, दया टिकम, अनुष्का राऊळ, प्राची तोरसकर, सीमा पाटील, उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)