ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रा.पं. सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री नवलराज काळे  यांचा वाढदिवस ; श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडूरे - शिराळे विकास मंचच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ग्रा.पं. सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री नवलराज काळे  यांचा वाढदिवस ; श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडूरे - शिराळे विकास मंचच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 27 Aug 2023 03:26 PM
वाचन संख्या 198

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे – शिराळे येथील  ग्रा. पं. सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री नवलराज काळे  यांच्या वाढदिवस शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडूरे – शिराळे विकास मंच च्या वतीने  सडूरे शिराळे  ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळेतल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपचा कार्यक्रम संपन्न  झाला. यावेळी काळे यांचा सरपंच ग्रामसेवक उपसरपंच सदस्य शाळा शिक्षक विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांच्या वतीने  सत्कार करण्यात आला. उपस्थित सडुरे केंद्र शाळा नंबर एक , जिल्हा परिषद शाळा शिराळे, जिल्हा परिषद शाळा तांबळघाटी मधील सर्व विद्यार्थ्यांना व सडुरे शिराळे अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच आनंदा जंगम, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, प्रियंका पाटील, विशाखा काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा जंगम, तंटा मुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, भाजपा शिराळे बूथ अध्यक्ष विजय पाटील, मुख्याध्यापक श्री कुवर सर, शिक्षिका खांबल मॅडम, शिराळे मुख्याध्यापक विनोद करपे सर, शिक्षक स्वप्निल गुरखे सर, केळकर मॅडम, तांबळघाटी शाळा मुख्याध्यापक भैराळे सर,परशुराम डांगे, प्रभाकर पाटील, हिरावती पाटील, दीपक पाटील, प्रकाश पाटील, जयेंद्र बोडेकर, अनिल पाटील,रामचंद्र उर्फ शाहू बोडेकर, बाळकृष्ण बोडेकर, सविता बोडेकर, वेदिका विजय बोडेकर, संदीप धामणे,नामदेव पाटील,अक्षय पाटील,कमलेश धामणे, परशुराम पाटील,भगवान बोडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, कोतवाल मोहन जंगम,पाणी कर्मचारी अशोक पाटील, प्रभाकर राणे,रोजगार सेवक सागर मेजारी, अंगणवाडी सेविका जागृती रावराणे, सौ जंगम व तिन्ही प्रशालेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२५ ऑगस्टला प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला तर २६ ऑगस्टला रोजी शाळा शिराळे व  तांबळघाटी या दोन शाळेमध्ये  कार्यक्रम संपन्न झाले. तर चव्हाणवाडी येथील सोमवारी सकाळी होणार आहे. तरी  तालुक्यातील इतर काही शाळेत देखील पुढील काही दिवस हा उपक्रम चालू ठेवण्याचा मानस चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नवलराज काळे यांचा आहे. उपस्थित राहून सर्व ग्रामस्थांनी नवलराज काळे यांना शुभेच्छा दिल्याबद्दल काळे त्यांनी सर्वांच्या आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स