चिंदर येथील सर्पमित्र स्वप्निल गोसावींचे 'सर्पसाक्षरता अभियान'..!
समाजातील सर्वांपर्यंत सापांबाबत जनजागृती व्हावी हा पर्यावरणपूरक उद्देश..
विवेक परब | चिंदर : सर्व स्तरांतील माणसांनी सर्पसाक्षर होऊन समाजाला सर्पांबाबत माहिती देऊन व घेऊन जनजागृती व्हावी हा प्रामाणिक उद्देश ठेवून चिंदर सडेवाडी येथील प्राणी मित्र, सर्पमित्र स्वप्निल सुर्यकांत गोसावी हे वाडी वाडीत वा वस्ती वस्तीत जाऊन लोक जागृती करण्याचा अभिनव उपक्रम राबवत आहेत.
चिंदर भटवाडी भगवती मंदिर येथे त्यांनी सर्पांविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते आणि त्याला युवकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
आपल्या परिसरात असणाऱ्या सर्पांच्या 25 जाती व त्यातील 17 बिन विषारी, 3 निम विषारी आणि 5 अति विषारी यांची माहिती त्याच प्रमाणे तापमाना नुसार सर्पांच्या रंगा मध्ये होणारे बदल सर्प ओळखण्याच्या खूणा या बाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लोकांच्या शंकानचे समाधान पूर्वक निरसन केले. यापूर्वी स्वप्नील यांनी अनेक ठिकाणी अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत. स्वप्निल गोसावींच्या या उपक्रमाबाबत लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)