आमदार वैभव नाईक यांनी खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांच्या प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर द्यायाची केली मागणी ; मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश.
कणकवली | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची मुंबई येथील खादी भवनात भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांतील प्रलंबित सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही.
नियमितपणे कर्जाची परतफेड करून देखील सबसिडी मिळाली नाही त्यामुळे नागरिकांना नवीन कर्ज प्रकरणे करता येत नाहीत त्याचबरोबर बँक देखील एनओसी देत नाहीत. याकडे आ. वैभव नाईक यांनी रविंद्र साठे यांचे लक्ष वेधत कर्ज प्रकरणाची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर रविंद्र साठे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर जमा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)