रेल्वेच्या धडकेत सातोसेतील वृद्धाचा मृत्यू
बांदा : सातोसे -देऊळवाडी येथील रामचंद्र राघोबा नाईक (६७) या वृद्धाचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकनजीक आढळून आला. रात्रीच्या सुमारास गोव्यातून चालत येत असताना त्यांना रेल्वेची धडक बसली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे प्रशासनाने अपघाताची माहिती सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर यांना दिली. त्यांनी ग्रामस्थांसमवेत घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. बुधवारी सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन केले. दुपारी सातोसेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, मुलगा, विवाहित बहिणी असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)