कास उपसरपंच गजानन पंडीत यांचे निधन
बांदा /प्रतिनिधी : कास गावचे उपसरपंच गजानन नारायण पंडीत (५९) यांचे बुधवारी सकाळी बांबोळी रुग्णालयात निधन झाले. ते न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. गेले आठ दिवस त्यांच्यावर बांबोळीत उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अखेर बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)