ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
के.मंजुश्री यांची  बदली।     कोल्हापूर महानगर आयुक्तपदी . सिंधुदुर्ग  जिल्हा धिकारी पदी श्री.किशोर तावडे यांची नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

के.मंजुश्री यांची बदली। कोल्हापूर महानगर आयुक्तपदी . सिंधुदुर्ग जिल्हा धिकारी पदी श्री.किशोर तावडे यांची नियुक्ती.

प्रकाशन: 22 Aug 2023 03:31 PM
वाचन संख्या 81

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची नियुक्ती झाली आहे. के मंजुलक्ष्मी तब्बल साडे पाच वर्षे सर्वाधिक काळ जिल्ह्यात प्रशासकीय कारभार करणाऱ्या अधिकारी ठरल्या आहेत. कोरोना काळातील त्याचे कार्य सर्वोत्तम ठरले आहे . कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांना नियुक्ती शासनाने केली आहे .के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी सिंधुदुर्ग मधेच २० मे २०२० रोजी जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली . त्यानंतर आता त्यांची बदली झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्ष आणि जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्ष सहा महिने त्या राहिल्या आहेत. आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक काळ त्या जिल्ह्यात राहिल्या आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जिल्ह्यात काम केलेल्या पाच अधिकाऱ्यांना जिल्ह्यातच जिल्हाधिकारी पदी बढती मिळाली. त्यातही के .मंजुलक्ष्मी या सर्वाधिक काळ जिल्ह्यात राहिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स