बांदा येथील नट वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी निलेश मोरजकर यांची निवड
बांदा /राकेश परब : कोकणातील १३० वर्षे जुने असलेले ‘अ’ वर्गातील येथील नट वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी निलेश मोरजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी श्री मोरजकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मासिक बैठक वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी स्वीकृत सदस्य म्हणून माजी सेवानिवृत्त प्रा. प्रकाश पाणदरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री मोरजकर हे बांद्यातील पत्रकार असून वाचनालयच्या संचालक मंडळातील त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, जगन्नाथ सातोसकर, प्रकाश पाणदरे, संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब, सुविंद्र बांदेकर आदी उपस्थित होते. श्री मोरजकर म्हणाले की, सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आपण वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असून वाचकांच्या सोईसाठी लवकरच ई – लायब्ररी सुरु करण्यात येणार आहे. भविष्यात वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)