ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे‌ यांची निवड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे‌ यांची निवड

प्रकाशन: 21 Aug 2023 01:46 PM
वाचन संख्या 38

बांदा : राकेश परब जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर गणपत आगलावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली होती या पालक सभेत विविध समित्या गठीत करण्यात आल्या.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सन २०२३-२४ते २०२५-२६ या दोन वर्षांच्या कार्य काळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे उपाध्यक्षपदी संपदा सिद्धये,स्थानिक प्राधिकरण सदस्य रूपाली शिरसाट, शिक्षणप्रेमी निलेश मोरजकर, सदस्य पदी सुशांत ठाकूर,राधिका गवस,दिक्षा ठाकूर,प्रमिला कदम, प्रदीप वाडकर,संतोष बांदेकर,हेमंत मोर्ये, श्रद्धा नार्वेकर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून जे.डी.पाटील , विद्यार्थी प्रतिनिधी दर्पण देसाई व रोहिणी चव्हाण तर सचिवपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांची निवड करण्यात आली. शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये उपाध्यक्षपदी हेमंत दाभोळकर,आलिशा कोळापटे, तनुजा वराडकर, गुरूदत्त कल्याणकर,दिपक बांदेकर,रेणूका कुंभार ,गणराज गुळेकर, ज्ञानेश्वर पालकर,दिव्या गावडे तर सचिवपदी शिक्षक रंगनाथ परब यांची निवड करण्यात आली.माता पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये उपाध्यक्षपदी तन्वी काणेकर, सदस्यपदी स्मिता वायंगणकर,नेहा सावंत, संचिता मंजिलकर,गौरी गावडे, अस्मिता माजगावकर, संचिता कुबडे, रत्नमाला वीर, वैष्णवी सातोसकर तर सचिवपदी शिक्षिका रसिका मालवणकर यांची निवड करण्यात आली. याचबरोबर यावेळी शालेय पोषण आहार व परिवहन समितीचीही स्थापना करण्यात आली. यावेळी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या पुर्वा हेमंत मोर्ये व दिव्या मारुती तरटे या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करण्यात आले.स न २०२३-२४या शैक्षणिक वर्षात शाळेत राबवावयाच्या विविध उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. . यावेळी नुतन अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करूया असे सांगितले..सभेचे सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी केले तर आभार शांताराम असनकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स