ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर शतक महोत्सव समिती तर्फे प्रशाला झाली संगणीकृत ; स्वातंत्र्य दिनाचे औचित्य.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर शतक महोत्सव समिती तर्फे प्रशाला झाली संगणीकृत ; स्वातंत्र्य दिनाचे औचित्य.

प्रकाशन: 18 Aug 2023 02:48 AM
वाचन संख्या 83

विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन सोहळा झाला संपन्न.

मालवण | प्रतिनिधी : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून इंटरनेट आणि संगणकामुळे जग एका बोटाच्या क्लिकवर आले आहे. अशावेळी आमच्या मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी शतक महोत्सव समितीने जो संगणक आणि प्रिंटर दिला आहे त्याचा योग्य वापर मुलांनी करून प्रगती साधावी असे आवाहन प्राथमीक विद्यामंदिर शतक महोत्सव समिती डांगमोडेचे सल्लागार श्री. सुरेंद्रनाथ ठाकूर यांनी डांगमोडे येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शतक महोत्सव समिती तर्फे प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा संगणीकृत करण्यात आली. या शाळेला देण्यात आलेल्या संगणक व प्रिंटर चे उदघाटन सुरेंद्रनाथ ठाकूर व माजी पं. स. सदस्या सौ. गायत्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सौ. गायत्री ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

भारताचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा झाला. यावेळी मुख्याध्यापक श्री. डोंगळे यांनीही शाळा, स्वच्छता, व्यसनाचे दुष्परिणाम, गांवचा विकास याविषयीं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ नागरिक प्रकाश ठाकूर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देताना स्वातंत्र्यवीराच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे व योगदान देण्याविषयीचे महत्व स्पष्ट केले

विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी यावेळी मुख्याध्यापक श्री. डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी २३ योगासने सादर केली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. डोंगळे यांनी केले तर आभार शशांक ठाकूर यांनी मानले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर ठाकूर, उपाध्यक्ष महेश ठाकूर यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. तर शतक महोत्सव समिती अध्यक्ष नारायण ठाकूर, बाळप्रकाश ठाकूर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स