ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेतील पावणाई स्वयं सहाय्यता महिला बचत गटाची सत्कार, सन्मान व इतर उपक्रमांबद्दल केली माजी सैनिकांनी जाहीर प्रशंसा…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेतील पावणाई स्वयं सहाय्यता महिला बचत गटाची सत्कार, सन्मान व इतर उपक्रमांबद्दल केली माजी सैनिकांनी जाहीर प्रशंसा…!

प्रकाशन: 16 Aug 2023 02:17 AM
वाचन संख्या 174

माजी सैनिकांच्या युद्धभूमीवरील आठवणींना ऐकून श्रोते झाले रोमांचित..!

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाच्या समारोपाचे औचित्य साधून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियाना अंतर्गत मसुरे येथील पावणाई स्वयं सहाय्यता बचत गटाच्या वतीने मसुरे येथील माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या वीर पत्नींचा ‘वीर जवान तुझे सलाम’ असा अनोखा गौरव समारंभ आयोजीत केला होता. हा कार्यक्रम बचत गटाच्या अध्यक्षा हेमलता दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

स्वयं सहाय्यता बचत गटाने आम्हा माजी सैनिकांचा जो आज मान सन्मान केलात याबद्दल या गटाच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे असे प्रतिपादन मसुरे येथील माजी सैनिक तथा माजी तलाठी धनंजय सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले . ते पुढे म्हणाले की सैन्य दलासारखी जगात दुसरी कोणतीही मनाला आनंद देणारी नोकरी नाही. शिस्त म्हणजे काय असते हे या नोकरीतून शिकायला मिळते आणि या सैन्य दलातून जो नोकरी करून बाहेर पडतो तो नेहमी परिपूर्ण असा घडलेला असतो. आज शालेय जीवनातही सैन्य दलाची आणि अध्यात्माची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाला मंचावर बचत गटाच्या उपाध्यक्ष सौ नीलम दळवी, सचिव सौ ज्योती पेडणेकर, माजी सैनिक धनंजय सावंत, अशोक मोरे, दीपक बागवे, वीर पत्नी श्रीमती कल्पना दुखंडे, प्रकाश चव्हाण, रवींद्र दुखंडे, महेश दुखंडे, विलास राणे, केंद्र शाळा मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत,
माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, विजेता पारकर, मनीषा शिंदे, नूरजहा शेख, मोनिका दूखंडे, शीतल मसुरकर, शकिरा शेख़, सुरेखा परब ,विनोद सातार्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक दीपक बागवे, धनजय सावंत, अशोक मोरे यांचा आणि माजी सैनिक कै.मोहन दुखंडे यांच्या वीरपत्नी कल्पना दुखंडे, कै.बिभीषण चव्हाण यांचे बंधू प्रकाश चव्हाण, कै. नारायण गावडे यांच्या पत्नी श्रीमती शानन गावडे, कै. बाबुराव राणे यांचे चिरंजीव विलास राणे, पुणे येथे असलेले मसुरे सुपुत्र माजी सैनिक श्री रवींद्र दुखंडे यांचे बंधू महेश दुखंडे यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक अशोक मोरे, दीपक बागवे, धनंजय सावंत यांनी जीवाची बाजी लावून देशासाठी लढताना प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनेक थरारक प्रसंग उपस्थित महिला वर्गाला सांगताना प्रत्येक श्रोत्याच्या अंगावर रोमांच उभा राहीला.
बचत गटाच्या अध्यक्षा हेमलता दुखंडे यांनी बचत गटाच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळाचा आणि कामाचा आढावा उपस्थितांना विशद करून यापुढेही या महिला बचत गटाच्या माध्यमातून समाजभिमुख काम करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितना दिले. माजी सैनिक अशोक मोरे यांनी युद्धभूमीवर आपल्याला शत्रूची गोळी लागलेली असतानाही युद्धभूमी वरती देशासाठी लढताना आलेल्या चित्त थरारक प्रसंग जागा करून त्याप्रसंगी देशसेवा हेच आपले जीवन असल्याचे यावेळी सत्कारास उत्तर देताना सांगितले. माजी सैनिक दीपक बागवे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीर जवानांचा सत्कार करणारा मसुरे येथील श्री पावणाई स्वयंसहायता महिला बचत गट हा पहिला बचत गट असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला या बचत गटाचा सार्थ अभिमान आहे. आज माजी सैनिकांचा सन्मान करताना या बचत गटाने एक सामाजिक बांधिलकी जोपासून समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक विनोद सातार्डेकर यांनी केले. विनोद सातार्डेकर यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन या बचत गटाच्या वतीने त्यांचा लक्ष्मी पेडणेकर यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. मसुरे गडगेरा बाजारपेठ येथील महेश दुखंडे परिवारातील चार पिढ्या या सैन्य दलात देश सेवा बजावल्यामुळे या परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत मनीषा शिंदे यांनी केले तर सौ शितल मसुरकर यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स