ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मी बिया पेरल्या आहेत, मी प्राणवायू जपणार आहे ; छोट्या कबीराचा निसर्ग दोहा. ( विशेष )

मी बिया पेरल्या आहेत, मी प्राणवायू जपणार आहे ; छोट्या कबीराचा निसर्ग दोहा. ( विशेष )

प्रकाशन: 16 Aug 2023 01:45 AM
वाचन संख्या 369

मालवण | सुयोग पंडित : आपली चूक नसताना ठामपणे ‘”मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही”, हे टिळकांचे वाक्य जाज्वल्य ताठ कण्याचे एक शिकवण उदाहरण आहे. निसर्गासमोर मात्र सध्या मानवाला हा आविर्भाव ठेवून चालणार नाही इतकी निसर्गाची अपरिमित हानी सध्या होत आहे व झालेली आहे. सावंतवाडी शहरातील शांती निकेतन स्कूलच्या एका दुसरीच्या विद्यार्थ्याला निसर्गासमोर लवचिक होत त्याला व पर्यायाने पर्यावरणाला जपायची इच्छा आहे. कु. कबीर हेरेकर असे त्याचे नांव आहे. त्याचे वय संदेश वगैरे देण्याएवढे मोठे नाही परंतु त्याच्या मनावर ‘पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धन’ हे दोन घटक उत्तमपणे बिंबवले गेले आहेत.

कु. कबीर हेरेकर याने यंदाचा स्वातंत्र्य दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. स्वतः गोळा केलेल्या आंबा, फणस व जांभूळ बिया त्याने मळगांव व इन्सुली येथील जंगलात जाऊन पेरल्या. यात १०८ आंब्याच्या बाठी, ८७ फणस बिया आणि ६२ जांभूळ बिया अशा एकूण २५७ बियांची त्याने पेरणी केली. निसर्ग व पर्यावरण यांकडे कबीरची ओढ ही प्राणवायू शुद्धीकरण, संधारण व वृक्ष संवर्धन या अत्यावश्यक गोष्टींना थेट हात घालणारी आहे आणि त्यामुळेच या ‘छोट्या कबीराची ही कृती मानवजाती साठी कृतीचा निसर्ग दोहाच आहे….नाही का..!’

छोट्या कबीर हेरेकर हा एरवीही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांत त्याचे वेगळेपण जपत असतो ज्यात त्याचे पेशाने शिक्षक असणारे वडिल नावेद हेरेकर हे त्याला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शनना नंतरची समाज व निसर्ग उपयोगी कृती कु. कबीर सातत्याने करत असतो म्हणून त्याची विशेष प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स