मसुरेतील पावणाई महिला बचत गटाच्या वतीने भारतीय सैनिकांना ५०० राख्या भेट ; उपक्रमाची तहसीलदार वर्षा झालटे यांनी केली प्रशंसा.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘पावणाई स्वयंसहायता महिला बचत गट मसुरे, गडघेरा बाजारपेठ’ या महिला बचत गटाच्या वतीने सीमेवरील सैनिकांना राखीतून मानवंदना देण्यासाठी ५०० राख्या सीमेवरील सैनिकांसाठी भेट म्हणून मालवणच्या तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांच्याकडे तहसीलदार कार्यालयात सुपूर्द केल्या. यावेळी बचत गटाच्या सदस्या तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सौ विजेता पारकर उपस्थित होत्या. पावणाई महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल मालवणच्या तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांनी गौरवोद्गार काढले.
सामाजिक जाणीवेतून आणि वीर जवानांन प्रति आदर भावना आणि प्रेम व्यक्त करणारा पावणाई महिला बचत गटाचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. मसुरे येथील हा बचत गट नेहमी समाजाभिमुख विविध उपक्रम राबवत असतो. या बचत गटाचे आज तालुक्यामध्ये खूप मोठे नांव आहे याबद्दल या बचत गटातील सर्व सदस्यांचे सुद्धा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या महिला बचत गटामध्ये अध्यक्ष हेमलता दुखंडे,सचिव ज्योती पेडणेकर, नीलम दळवी, शितल मसुरकर, सुरेखा परब, मोनिका दुखंडे, मनिषा शिंदे, शाकीरा शेख़, नूरजहाँ शेख़ या महिला कार्यरत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)