ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सावंतवाडी येथील ॲड.आरती पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सावंतवाडी येथील ॲड.आरती पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड.

प्रकाशन: 13 Aug 2023 06:29 PM
वाचन संख्या 139

कणकवली | गणेश चव्हाण : नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य वर्ग १ पदी नुकतीच ॲड. आरती पवार यांची निवड झाली. सावंतवाडी येथील ॲड. आरती पवार या सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक अभिरक्षक या पदी कार्यरत आहेत. त्यांनी कराड येथील लॉ कॉलेज येथे एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग मधील इतर तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात तसेच गोवा येथील न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रॅक्टिस केली.

या यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले. हे यश संपादन करण्यास ॲड. श्रीनिवास गवस व ॲड. वैभव चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदी ॲड. आरती पवार यांची निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स